राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)
मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठान संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषि महाविद्यालय व दादासाहेब मोकाशी अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, राजमाची यांच्या संयुक्त विद्यमान तृतीय वर्ष सहाव्या सत्रात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा *एनएसएस निवासी कॅम्प मौजे बनपुरी* याठिकाणी सोमवार दिनांक १ एप्रिल ते शुक्रवार दिनांक ५ एप्रिल, २०२४ या कालावधीत आयोजित केला होता यावेळी कॅम्प चे उद्घाटन मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व संचालक श्री विलास चौधरी, लोकनियुक्त सरपंच मा. मनोज पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. अशोक पाटील, स्वच्छ्ता कमिटीचे अध्यक्ष मा. विश्वनाथ कडव, बनपुरी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एस. व्ही. संकपाल उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मौजे बनपुरी याठिकाणी रस्ते, शाळा, धार्मिक स्थळे, ग्रामपंचायत परिसर, गल्ली याठिकाणी श्रमदान केले. तसेच युवकांचे चारित्र्य व व्यक्तिमत्व विकास यासाठी तज्ञ डॉ. एस. आर. पाटील, श्री. विकास देशमुख, डॉ. एस. एम. घाडगे, प्रा. सचिन पुजारी यांनी मार्गदर्शन केले. देशभक्ती, सामुदायिक सेवा, समाजाच्या कल्यानाप्रती आंतरिक भावना असे उद्दीष्ट समोर ठेवून कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. एन एस एस अंतर्गत आयोजित निवासी कार्यक्रमाचे सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून समाधान व्यक्त केले यामध्ये कु. आरती गुरव, कृष्णाजी जाधव, ज्योत्स्ना गुरव, प्रितेश आगळे यांनी दर्शनी भागाच्या विविध केलेल्या कामाला उजाळा दिला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्य व श्रमदान यासाठी मोकाशी कृषि विकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी साहेब, उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी साहेब यांनी प्रोत्साहन दिले. प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे, प्रा. ए. एस. ढाणे, डॉ. पी. पी. पाटील, एन एस एस समन्वयक डॉ. एस. एस. भूतकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. निकम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहभागाने आणि सहकार्याने एनएसएस कॅम्प यशस्वी झाला आपल्या संस्थेच्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक कार्यक्रमासाठी नेहमीच सर्वांकडून अपेक्षा
प्रा. ए. एस ढाणे (DMCFT )
प्राचार्य डॉ. के. एस. घुटुकडे (DMCA)
डॉ. एस. एस. भूतकर एनएसएस समन्वयक
प्रा. एस. एस. निकम कार्यक्रम अधिकारी